मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना : महिलांनो, रद्द झालेले अर्ज, दुरुस्तीसह पुन्हा दाखल करण्याचे सरकारचे आवाहन, येथे जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.. !
Mukhyamantri Ladki Bahin Yojana Form Resubmit Online 2024
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक अर्ज (Ladki Bahin Yojana Disapproved Form) अंशतः रद्द झालेले आहेत. या अर्जात त्रुटी असल्यामुळे (Ladki Bahin Yojana Form Resubmit Online) पुन्हा दाखल करणे प्रलंबित आहे.
सर्व संबंधितांनी तातडीने योग्य त्या दुरुस्त्या करुन Disapproved अर्ज (Ladki Bahin Yojana Form Resubmit Online) पुन्हा सबमिट करावे. यामुळे, त्यांची पडताळणी करुन पात्र लाभार्थींना तातडीने लाभ देणे सोयीचे होईल. कोणताही पात्र लाभार्थी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलाय, पण पैसे आले नाहीत; मग असे करा!
अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत. परंतु अजूनही प्रक्रिया सुरु आहे. काही महिलांच्या खात्यांत येत्या काही दिवसांत पैसे जमा होणार आहेत. काही महिलांच्या अर्जातील त्रुटी आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे पैसे जमा झाले नाहीत. यासंदर्भात शासनाकडून गाईडलाईन जारी केल्या आहेत.
तुम्ही लाडकी बहीण पोर्टल किंवा नारीशक्ती अॅपवरून अर्ज केला आहे आणि तो मंजूर झाला आहे. परंतु पैसे बँक खात्यात आले नाहीत, तर:
2. अर्जातील त्रुटीची माहिती: तुमच्या मोबाइलवर अर्जातील त्रुटीबाबत काही मेसेज आले आहेत का? त्या त्रुटीची पूर्तता करुन अर्ज पुन्हा सबमिट करा.
3. आधार लिंक असलेल्या दुसऱ्या बँक खात्यात: पैसे जमा झाले आहेत का ते देखील तपासून पहा.
4. बँक खाते उघडणे: महिलांनी कोणत्याही एजंटला बळी पडू नये. बँक खातं उघडण्यासाठी कोणत्याही बँकेत ५०० किंवा १००० रुपये देऊन कागदपत्रे सादर केली जाऊ शकतात.
लाडकी बहीण योजनेचा नामंजूर अर्ज ऑनलाइन पुन्हा सबमिट करा –!
Ladki Bahin Yojana Form Resubmit Online:
नारीशक्ती दूत अॅप वापरून ज्यांनी स्वतःचे वा अन्य लाभार्थीचे अर्ज केले आहेत अशा सर्व महिलांनी, समूह संसाधन व्यक्ती, बचत गट अध्यक्ष, सचिव, गृहिणी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक इत्यादींनी नारीशक्ती दूत अॅपवर लॉगिन करुन अर्जाची यादी पाहू शकता. यामध्ये अर्जाचे स्थिती (Approved, Disapproved, Pending, Rejected) तसेच लाभार्थीचे नाव, मोबाईल नंबर पाहता येतील.
अर्ज पुन्हा सबमिट करण्याची प्रक्रिया – Ladki Bahin Yojana Form Resubmit Online Process:
1. Disapproved अर्ज: सर्व संबंधितांनी Disapproved असलेल्या लाभार्थ्यांना संपर्क करुन अंशतः अर्ज रद्द होण्याचे कारण View Reason या टॅबवर बघून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.
2. Edit Form: त्यानंतर Edit Form टॅबवर जाऊन यापूर्वी केलेल्या नोंदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करुन Form Submit करावा. यामध्ये फक्त Form एकदाच Edit करता येईल.
अस्या नवीन अपडेट साठी WhatsApp चॅनेल जॉईन करा 👉
तुमच्या अर्जाची वेळेवर दुरुस्ती करणे आणि पुनः सबमिट करणे हीच तुमच्या लाभप्राप्तीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे, विना विलंब अर्ज करा आणि लाभ मिळवा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा