40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कडून मिळतील १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज! असा घ्या फायदा – वसंतराव नाईक थेट कर्ज योजना
नमस्कार मित्रांनो,
आजच्या युगात अनेक सुशिक्षित व्यक्ती त्यांच्या शिक्षणानंतर योग्य नोकरीच्या शोधात असतात, परंतु त्यांना यशस्वीपणे व्यवसाय सुरु करण्याची संधी मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी पैसे आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. वसंतराव नाईक थेट कर्ज योजना (VJNT Loan Scheme) हे याच समस्येचं समाधान देण्यासाठी सरकारने दिलेलं एक महत्वाचं पाऊल आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील निराधार आणि विधवा महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळवता येऊ शकतं.
VJNT कर्ज योजनेची वैशिष्ट्ये
१. बिनव्याजी कर्ज:
महाराष्ट्र सरकारच्या वसंतराव नाईक थेट कर्ज योजना (VJNT कर्ज योजना ) योजनेअंतर्गत, सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींना व्यवसाय सुरु करण्यासाठी १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येत नाही.
२. पात्रता व प्राधान्य:
- शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत तसेच शासकीय/निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना प्राधान्य देण्यात येते.
- निराधार आणि विधवा महिलांना प्राथमिकता दिली जाते.
३. कर्ज वितरण पद्धती:
- एक लाख रुपयांपैकी प्रथम हप्ता म्हणजेच ७५% (७५,००० रुपये) कर्ज मिळवता येईल.
- दुसरा हप्ता म्हणजेच २५% (२५,००० रुपये) व्यवसाय सुरु झाल्यानंतर साधारणतः ३ महिन्यांनंतर जिल्हा व्यवस्थापकांच्या तपासणी नंतर दिला जातो.
विश्वकर्मा योजना मोफत शिलाई मशीन योजना 2024 ऑनलाइन अर्ज कसा भरावा -
अन्नपूर्णा योजना(Annpurna Yojana): 70% लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडरचा लाभ का मिळणार नाही?
व्यवसाय प्रकार
VJNT कर्ज योजनेअंतर्गत तुम्ही खालील व्यवसाय सुरु करू शकता:
- मत्स्य व्यवसाय
- कृषी क्लिनिक
- पॉवर टिलर
- हार्डवेअर शॉप
- पेंट शॉप
- सायबर कॅफे
- संगणक प्रशिक्षण
- झेरॉक्स
- स्टेशनरी
- सलुन
- ब्युटी पार्लर
- मसाला उद्योग
- पापड उद्योग
- वडापाव विक्री केंद्र
- भाजी विक्री केंद्र
- ऑटोरिक्षा
- चहा विक्री केंद्र
- सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र
- ड्राय क्लिनिंग सेंटर
- हॉटेल
- टायपिंग इन्स्टीट्युट
- ऑटो रिपेअरींग वर्कशॉप
- मोबाईल रिपेअरिंग
- फ्रिज दुरुस्ती
- ए. सी. दुरुस्ती
- चिकन शॉप
- मटन शॉप
- इलेक्ट्रिकल शॉप
- आईस्क्रिम पार्लर
- इत्यादी
अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाईन अर्ज:
1. VJNT पोर्टलवर जाऊन “नोंदणी” पर्यायावर क्लिक करा. - अधिकृत वेबसाइट
2. अर्ज तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
3. अर्ज सबमिट करा.
ऑफलाइन अर्ज:
1. आपल्या जिल्हा कार्यालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागात जा.
2. अर्जाचे नमुना घ्या, माहिती योग्यरित्या भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जमा करा.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- बँक खात्याचा तपशील
- उत्पन्नाचा दाखला (कौटुंबिक वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असावे)
- रहिवासी दाखला
- रेशन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- जातीचा दाखला
- शपथपत्र
कर्ज वसुली कार्यपद्धती:
- कर्जाची परतफेड कर्ज वितरित केल्याच्या ९० दिवसांनंतर सुरू करावी.
- मासिक हप्ते ठरवून, आगाऊ धनादेश किंवा ECS पद्धतीने वसुली करावी.
महत्वाचे संपर्क
- संपर्क क्रमांक: 2620 2588 | 2620 2588
- अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अर्ज कर्त्यांनी लक्षात ठेवावे:
- एकाच कुटुंबातील एकच व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकते.
- नवीन कर्जाच्या लाभासाठी, पूर्वीच्या कर्जाची पूर्ण परतफेड आवश्यक आहे.
अस्या नवीन अपडेट साठी WhatsApp चॅनेल जॉईन करा 👉
VJNT कर्ज योजना 2024 चा लाभ घेऊन, आपल्याला व्यवसाय सुरु करण्यास मदत होईल आणि आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी वरील संपर्क क्रमांक वापरून किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासणी करा.
धन्यवाद!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा